अशी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्की असते जिची आठवण आपल्याला हसवते , रडवते . सुन्न करते , बधीर करते , शांत करते , सैरभैर करते , हतबल करते , ऊर्जा देते , अधीर करते... एकाच व्यक्तीच्या आठवणींमध्ये ईतक्या साऱ्या शेड्स असतात ! अन् तशी कुणी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं आयुष्य अपुर्ण आहे असं नक्की समजायचं !
ही पोस्ट वाचली आणि कुणी तरी आठवणी वर मोरपीस फिरवल असं वाटलं ,खरे आहे न ,आयुष्यात एखादी तरी व्यक्ती नक्की असते जी आहे म्हणून आपलयाला आपलं अस्तित्व समजते....ती सभोवताली असो किंवा इथे आसपास कुठे तरी अगदी डोळ्याच्या समोर नसेल तरी चालते पण संपर्कात हवी ,तिची हालचाल समजावी इतकी अपेक्षा असते ..त्या व्यक्तीच आपल्या जीवनातील स्थान वेगळं असते ...ती अगदी कुठे बाहेर गेली किंवा तिचा संपर्क झाला नाही तरी मन उगाच बेचैन होत ....आज काल whats app मुळे 1000 वेळा स्टेटस DP लास्ट सीन तरी चेक करता येतो...पण ही हुरहूर बळ देते जगायला उभारी देते ...आपलं माणूस आपलं असलं तरी आणि आपलं माणूस आपलं नाहीच याची जाणीव असली तरी ....अंगणी प्राजक्त ओघळत असला की मी नेहमी पाहते त्याची फुल आपलं अस्तित्व सोडून देतात ...अगदी कसला ही मोह न ठेवता...किंवा मोगरा पहिला की हेच जाणीव होते इतका सुगंध देतो अगदी सुके पर्यंत देठाला बिलगून राहतो पण जेव्हा देठ त्याला सोडतो तेव्हा त्याची तक्रार नसते ...आठवणी आणि आपल्या माणसाचं तसेच आहे इच्छा अपेक्षा नाहीत त्यांनी त्याच अस्तित्व आपल्या भोवती टिकून ठेवावं असं ...बस यावं बहराव,रेंगाळावे आणि अलगद निघून जावं ...आपण मात्र त्याच्या आठवणीचेच गुणगान गात रमून जावं मोहरून जावं .....